धक्कादायक ! चोरट्यांच्या मारहाणीत दाम्पत्य जखमी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- जिल्ह्याचा क्राईम रेकॉर्ड गेल्या काही महिन्यात उच्च स्तरावर गेल्याचा दिसून येत आहे. पोलीस प्रशासन देखील केवळ दिखावेगिरी कामगिरी करत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हयात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांची झोप उडाली आहे, मात्र पोलीस प्रश्नाच्या हातावर तुरी देत चोरटे दिवसाढवळ्या चोऱ्या करत आहे. यामुळे पोलीस प्रशासनाच्या कामाबाबत नागरिकांकडून सवाल उपस्थित केले जाऊ लागले आहे. नुकतीच जामखेड शहरातील गोडाउन गल्ली येथे बुधवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास चोरटयांनी केलेल्या मारहाणीत पती-पत्नी गंभीर जखमी झाले.

यावेळी चोरटयांनी लाखांचा माल लंपास केला, याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत गणेश राम जाधव (रा. आईस फॅक्टरी, जामखेड) यांनी फिर्याद दिली. याबाबत अधिक माहिती अशी कि, जामखेड शहरातील गोडाऊन गल्लीमध्ये राहणारे गणेश जाधव यांच्या घरात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश केला. चाेरांनी घरात उचकावाचक सुरू केली. त्यावेळी गणेश जाधव व त्यांची पत्नी जागे झाले.

घरात चोर आल्याचे लक्षात येताच जाधव दाम्पत्य दरवाजा उघडून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला असता, चोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. चोरांनी टोकदार लोखंडी रॉडने गणेश जाधव यांच्या तोंडावर वार केला, तसेच पाठीवर, पायावर रॉडने मारहाण केली. जाधव यांच्या पत्नीने आरडाओरड केली.

चोरांनी पत्नीला दगड डोक्यात मारले. त्यामुळे त्यांची पत्नीही गंभीर जखमी झाली. चोरांनी गणेश जाधव यांच्या खिशातील तीनशे रुपये, पत्नीच्या अंगावरील मनी, गंठण, अंगठ्या असे ३२ ग्रॅम सोन्याचे दागिने, पर्समधील पाच हजाराची रोकड, मोबाइल असा एकूण एक लाख अकरा हजारांचा ऐवज चोरी गेला. माहिती समजताच पोलीस अधिकारी, कर्मचारी तेथे आले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी भेट दिली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment