धक्कादायक! पोलिस निरीक्षकांच्या हलगर्जीपणामुळे झालेय ‘असे’ काही की ‘इतक्या’ लोकांचे आरोग्य धोक्यात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अगदी कारागृहापर्यंत कोरोना जाऊन धडकल्याने खूप मोठी चिंताजनक परिस्थितीनिर्माण झालेली आहे.

परंतु आता राहुरीत पोलिस निरीक्षकांच्या हलगर्जीपणामुळे आणखीन चिंता वाढली आहे. त्यांनी चारजणांची क्षमता असलेल्या बराकीत १३ जणांना ठेवले. परंतु यात एक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी: देसवंडी येथे गुरुवारी सकाळी पत्र्याचे शेड बांधण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली होती. या घटनेमधील आरोपी गुरुवारी (ता. २७) पोलिसांना शरण आले.

राहुरी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यांना इतर कैद्यांबरोबर बराकीत ठेवण्यापूर्वी त्यांची कोरोना टेस्ट करण्यासाठी स्वॅब घेण्यात आले.

परंतु या अहवाल येण्याची वाट न पाहता राहुरीचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दोन्ही आरोपींना गुरुवारी रात्री तेरा कैदी असलेल्या बराकीत ठेवले.

शुक्रवारी रात्री त्यातील पोलिस कोठडीतील संशयित आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. त्यामुळे राहुरी पोलिसांश सर्वांचेच धाबे दणाणले.

बराकीतील इतर तेरा कैदी कोरोना पॉझिटिव्ह आरोपीच्या संपर्कात आले. दोन दिवस कारागृहाच्या सुरक्षेसाठी तैनात आठ पोलीस कर्मचारी यांचाही संपर्क आला. त्यामुळे, हा हलगर्जीपणा इतरांना जीवघेणा ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment