अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- एकीकडे प्रशासन, नागरिक कोरोनाशी दोन हात करत आहेत तर दुसरीकडे गुन्हेगारीच्या घटनाही घडत आहेत. यापासून सामान्य नागरिक तर त्रस्त आहेतच परंतु आता हे गुन्हेगार पोलिसांनाही टार्गेट करत असल्याचे दिसत आहे.
अशीच घटना राहुरीत नगर-मनमाड मार्गालगत बिरोबानगर परिसरात घडली. राहुरी शहर पोलिसाचे बंद घर फोडून चोरट्यांनी लाखभराचा ऐवज लांबवला.
याबाबत माहिती अशी: पोलिस वैभव साळवे हे बिरोबानगर येथील शिक्षक बँकेजवळ भाड्याच्या घरात राहतात. १८ जुलैला घराला कुलूप लावून ते कुटुंबासह सोनई या आपल्या मूळगावी गेले होते.
चोरट्यांनी मागील बाजूचा दरवाजा उचकटून घरात प्रवेश मिळवला. सामानाची उचकापाचक करून कपाटातील दागिने व २० हजारांची रोकड घेऊन त्यांनी पोबारा केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा