अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने आपला फास आवळायला सुरवात केली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे. जवळपास आता ५ हजारीकडे रुग्णसंख्येची वाटचाल जिल्ह्याची सुरु आहे.
आता कोरोना कारगृहातही जाऊन पोहोचला आहे. नगर जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये बंदिवासात असणाऱ्या ६६ कैद्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे आता प्रशासनाची चिंता आणि डोकेदुखी वाढली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासा, संगमनेर व राहुरी या चार तालुक्यांमध्ये बंदिवासात असणाऱ्या कैद्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
श्रीरामपूर तालुका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच नेवासा तालुक्यात बंदिवासात असणाऱ्या ४७ कैद्यांपैकी एकूण २३ जणांना कोरोना झाला आहे.
तसेच संगमनेर तालुका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार येथे ४६ पैकी २२ कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राहुरी तालुक्यात पोलीस कोठडीत असणाऱ्या दोन कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात आज २७९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. यात मनपा ११७, संगमनेर ३८, राहाता १८, पाथर्डी १४, नगर ग्रा.२१,
श्रीरामपूर ०५, कॅन्टोन्मेंट २३, नेवासा १, श्रीगोंदा १ पारनेर १०, अकोले १२, राहुरी ७, शेवगाव ४, कोपरगाव ५, कर्जत ३ आदी तुंगणांचा समावेश अशी. जिल्ह्यात ३६३९ रुग्ण अद्याप बरे झाले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा