धक्कादायक! ‘हा’ पूल कोसळण्याच्या मार्गावर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2020 :-  मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत येणाऱ्या टाकळी रस्त्यावरील घोड कॅनलवरील पुलाचे कठडे ढासळले असून त्याच्या दुरुस्तीची गरज निर्माण झाली आहे.

जर योग्यवेळी याची दुरुस्ती केलीनाही तर हा पूल कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा पूल त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

या रस्त्यावरील साधारणतः दहा किलोमीटर अंतरामध्ये छोटे-मोठे 30 पूल आहेत. त्यामधील 1960 साली बांधलेला पूल आज अखेरच्या घटका मोजत आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे या पुलाची दूरवस्था झाली आहे.

अपघात टाळण्यासाठी अवजड वाहनांची वाहतूक दुसऱ्या पर्यायी रस्त्याने वळविण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. दरम्यान,

हा पूल घोड कॅनॉलचा अंतर्गत येत असल्यामुळे या पुलाची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे, असे मुख्यमंत्री सडक योजने अधिकारी सांगत आहेत.

घोड कॅनॉलच्या अधिकाऱ्यांनाकडे दुरुस्तीची मागणी केली असता, त्यांनी आम्ही पूल दुरुस्तीचा प्रस्ताव दिलेला आहे, असे सांगून जबाबदारी झटकली आहे. यात मात्र नागरिक धास्तावलेले आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment