स्नेहालय संस्थेमधील मुलींच्या नावाचा वापर करून धक्कादायक प्रकार ! एकच खळबळ

स्नेहालय ही अहमदनगर जिल्ह्यातील एक नामांकित संस्था आहे. याठिकाणी अनेक निराधारांना आधार दिला जातो.

Ahmednagarlive24 office
Published:
snehalay

Ahmednagar News :  स्नेहालय ही अहमदनगर जिल्ह्यातील एक नामांकित संस्था आहे. याठिकाणी अनेक निराधारांना आधार दिला जातो.

परंतु आता या संस्थेच्या नावाचा गैरवापर करून, येथील मुलींच्या नावाचा गैरवापर करून धक्कादायक प्रकार काही समाजकंटक करत असल्याची घटना समोर आली आहे.

मागील काही दिवसांपासून स्नेहालय संस्थेच्या नावाचा वापर करून इंस्टाग्राम व अन्य सोशल मिडियाच्या माध्यमातून संस्थेतील लाभार्थी मुलींसोबत विवाह करून देण्यासाठी पैसे मागण्याचे उद्योग काही समाजकंटक, ठकबाज करत आहेत.

या होणाऱ्या प्रकारामुळे संस्थेबद्दल गैरसमज पसरत आहेत. तसेच आत्तापर्यंत अनेक विवाह इच्छुक तरुणांची व त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक झाली आहे. त्यांनी त्यासाठी पैसे देखील गमावले आहेत. त्यामुळे आता स्नेहालयतर्फे आता याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.

त्यांनी एक पोस्ट केली आहे व त्यात म्हटले आहे की, आम्ही या पोस्टद्वारे खुलासा करू इच्छितो की स्नेहालय संस्था वर्षातून एकदाच म्हणजे फक्त डिसेंबर महिन्यात सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करुन घेऊन लाभार्थी मुलींसोबत विवाह हा कार्यक्रम सार्वजनिकरित्या सरकारी परवानगीने राबविला जातो.

त्यासाठी अतिशय पारदर्शक पद्धतीचा अवलंब केला जातो. या संपूर्ण कार्यक्रमासाठी कुठल्याही प्रकारचा पैसा स्नेहालय आकारत नाही. त्यामुळे अशा पदहतीच्या कोणत्याही प्रकारच्या खोट्या अकाउंट्स आणि पोस्टला बळी पडू नका.

अशी कोणतीही पोस्ट आढळल्यास लगेच स्नेहालयच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. ९०११३६३६०० हा हेल्पलाईन नंबर देऊन या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन केले.

दरम्यान, स्नेहालय ही एक राज्यात नावाजलेली व सर्वोत्कृष्ट कार्य करणारी संस्था आहे. त्यामुळे या संस्थेबाबत अशा पद्धतीचे चुकीचे प्रयोग समाजकंटक करत असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe