धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला कुऱ्हाडीने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- साता जन्माची साथ देण्याचे वचन देत आयुष्याची गाठ बांधणाऱ्या पती पत्नीचे नातेच जगावेगळे असते.

मात्र या नात्याला तडा देत चारित्र्याच्या संशयावरून चक्क पतीने पत्नीला कुऱ्हाडीने मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

दरम्यान हि खळबळजनक घटना राहाता तालुक्यातील नपावाडी येथे घडली. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, राहाता तालुक्यातील नपावाडी येथे विठ्ठल बोर्डे यांच्या शेतातील झोपडीत शनिवारी पहाटे पत्नी पूजा विष्णू सोनावणे हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन

पती विष्णू सोनवणे याने कुऱ्हाडीने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात ही महिला गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर शिर्डी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पती विष्णू सोनवणे पत्नीला यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपी विष्णू जगन्नाथ सोनावणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुभाष भोये हे करीत आहेत.