धक्कादायक ! दोघा अज्ञातांकडून महिलेचे अपहरण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव गावांतर्गत असलेल्या पांढरे वस्ती येथील सुनंदा कुंडलिक भोजणे (वय ४५) या महिलेचे अज्ञात कारणावरुन खून करण्याच्या उद्देशाने दोघांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

याबाबत नुकताच तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यता आला आहे. याबाबतचे अधिक माहिती अशी कि, शिरसगाव येथील पांढरे वस्ती येथे वास्तव्यास असलेली

सुनंदा भोजणे या महिलेचे अज्ञात कारणावरुन खून करण्याच्या उद्देशाने चंद्रभान चांगदेव चौधरी (रा.शिरसगाव, ता.संगमनेर) व सुभाष नाना सूर्यवंशी (रा.लिंगदेव, अकोले) या दोघांनी संगनमताने अपहरण केले आहे.

या प्रकरणी महिलेचा मुलगा दिनेश कुंडलिक भोजणे याने संगमनेर तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक राहुल मदने हे करत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment