शॉर्टसर्किटने आठ एकर ऊस जळाला,शेतकऱ्यांचे ९ लाख रुपयांचे नुकसान

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथे शॉटसर्किटने ८ एकर ऊसाला आग भस्मसात झाला. पाच शेतकऱ्यांचे ९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

हि घटना रविवारी दुपारी घडली. मनोली-ओझर रस्त्यावर गट नंबर ३९ मध्ये दौलत मंगु बनवाले (१ हेक्टर), बाबासाहेब मंगु बनवाले (१ हेक्टर), गट नंबर ४१ मध्ये राजेद्रं बाळासाहेब शिदें (२४ गुंठे), संजय बाळासाहेब शिदें (२४ गुंठे) व प्रभाकर बाबुराव पराड (२ एकर) यांच्या ऊसाला विजेच्या खांबावर शॉटसर्कीट झाल्याने आग लागली.

काही क्षणातच ९ एकर ऊस आगीत भस्मसात झाला. जळीताची माहिती मिळताच थोरात कारखान्याचा अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. ग्रामस्थ व तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. महावितरण विज वाहक तारामुळे आगीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई द्यावी,

अशी मागणी सरपंच पुंजाहरी शिंदे, सदस्य बकचंद साबळे, झुंगाराम साबळे, गणेश शेपाळ, शांताराम शिंदे, पुंजाजी शिंदे, शांताराम पांडे, शिवाजी शेजुळ, बाळासाहेब शिंदे, शिवाजी शिंदे, संजय दिवे ग्रामस्थांनी केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment