अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- अहमदनगरमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. त्याचा ताण वैद्यकीय सुविधांवर येत आहे. कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक असणारी रेमेडिसीवर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे.
संगमनेर तालुक्यातही याचा तुटवडा जाणवत आहे. ठोक औषध विक्रेते पुण्यात यासाठी ठाण मांडून बसलेले आहेत परंतु याचा पुरवठा म्हणावा असा होत नसल्याचे समोर आले आहे.
आ.संग्राम जगताप यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी तातडीने नगरला इंजेक्शन पाठविली.
पवारांनी दिलेली 48 रेमेडिसीवर इंजेक्शन हे गरजूंना मोफत दिली जाणार असल्याची माहिती आ.जगताप यांनी दिली. अहमदनगर शहर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर यांच्याकडे आ. जगताप
यांनी हे इंजेक्शन सुपूर्त केले. ते गरजूंपर्यंत हे इंजेक्शन पोहचवतील असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. यावेळी नगरसेवक गणेश भोसले, अविनाश घुले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, युवकचे अध्यक्ष अभिजित खोसे,
वैभव ढाकणे, पराग झावरे, भुपेंद्र खेडकर, किरण रासकर आदी उपस्थित होते. दरम्यान, जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे.
आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत. रशियाने आपली लस लॉन्च केली आहे. तर भारतात ‘सीरम इन्स्टिटयूट’, ‘झाइडसकॅडिला’ आणि ‘भारतबायोटेक’ या तीन कंपन्यांकडून कोरोनाची लस तयार करण्याचे काम सुरू आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved