संगमनेर :- सध्या जगभरात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. देशात व राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्याने अत्यावश्यक सेवा वगळता लहान-मोठे उद्योगधंदे तसेच वाहतूक करणारी वाहने बंद करण्यात आली आहेत.
त्यामुळे अनेक परप्रांतीय मजुरांना याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. अनेकांना आपल्या घराची ओढ निर्माण झाली आहे.

अशातच एक मुलगा आपल्या ८० वर्षांच्या वृद्ध आईला तीनचाकी सायकल (व्हीलचेअरवर) बसवून पायी राजस्थानला आपल्या मूळ गावी निघाला आहे.
लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ ओढावल्याने घराची ओढ लागली असल्याचे गोपाल सिंग या तरुणाने सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.
त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकांना कोरोनाची लागण झाली. अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे काय नाव घेईना.
त्यामुळे सरकारने सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. पुणे, मुंबई, चाकण, कोल्हापूर, बंगळुरू आदी ठिकाणी वर्षांनुवर्षांपासून कामास असलेल्या परप्रांतीय मजुरांना याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे.
अनेक ठेकेदार मजुरांना वाऱ्यावर सोडून पळून गेले आहेत. त्यामुळे या परप्रांतीय मजुरांचे अन्न-पाण्यावाचून मोठ्या प्रमाणात हाल होऊ लागले. या मजुरांना आपल्या घराची ओढ लागल्याने ते लहान मुलाबाळांना पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून घेऊन जात आहेत.
अशातच राजस्थान याठिकाणी असलेले गोपाल सिंग यांचे कुटुंब व इतर अनेक मजूर बंगळुरूला काही वर्षांपासून काम करत होते; परंतु, लॉकडाऊनमुळे त्यांच्यासह इतर मजुरांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. हे मजूर या ठिकाणाहून काही वाहनांमध्ये कोल्हापूरला आले.
कोल्हापूरहून गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून हे सर्व मजूर पायी चालत पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून राजस्थानला जाण्यासाठी निघाले आहेत. हे मजूर विश्रांतीसाठी संगमनेर तालुक्यातील घारगाव, डोळासणे येथे थांबले होते.
थोडी विश्रांती घेऊन पुन्हा ते चालू लागले होते. हे जवळपास पंधरा ते वीस मजूर होते. यामध्ये गोपाल सिंग याची आई (वय ८०) हिची प्रकृती बरोबर नसल्याने गोपाल सिंग हा आईला व्हिलचेअर सायकलवर घेऊन पायी निघाला होता.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®