अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ श्रीगोंदा : रस्त्यावर विचित्र प्रकारे वाहन चालवणे, महाविद्यालय परिसरात गोंधळ घालणारे, रस्त्यात आडवीतिडवी वाहने लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात श्रीगोंदा पोलिसांनी नुकतीच मोहीम हाती घेतली आहे.
पोलिसांनी शहरातील पेडगाव चौकात दिवसभर बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करत त्यांना चांगलाच दणका दिला. पोलिसांच्या या धडक कारवाईची शहरात चांगलीच चर्चा रंगली तयाचसोबत नियम मोडणाऱ्यांनी मात्र या कारवाईचा धसका घेतला आहे.
सर्वसामान्य नागरिकांनी मात्र पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले आहे. पोलिसांनी पहिल्याच दिवशी केलेल्या कारवाईत एकूण ५७ वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून ११ हजार २००रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.