रस्त्याच्या कामासाठी मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्याबरोबरच नगर शहरातील अनेक रस्त्यांची नादुरुस्त अवस्था पाहून नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात चीड निर्माण झाली आहे.

यातच दरदिवशी या नागरी समस्येसाठी शहरात आंदोलने करण्यात येत आहे. यातच आज शिवसेनेच्या वतीने मनपा आयुक्तांच्या दालनातच आंदोलन करण्यात आले आहे.

बोल्हेगाव येथील गणेश चौकातील रस्त्याच्या कामासाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्त यांच्या दालनांमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

शिवसेनेचे नगरसेवक मदन आढाव, अशोक बडे, नीलेश भाकरे यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी अभियंता यांना बोलून घेत रस्त्याच्या कामाबाबत कान उघडणी केली. ठेकेदाराला ही चांगले सुनावले. तरी देखील नगरसेवकांचे हे आंदोलन सुरू आहे.

आयुक्त हे दालनातून बाहेर पडले आहेत. परंतु जोपर्यंत काम सुरू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतली आहे.

आयुक्त दालनाबाहेर पडल्यानंतरही या नगरसेवकांचे आंदोलन सुरू होते. या रस्त्याच्या कामासाठी आयुक्तांनी लेखी आश्वासन दिले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe