म्हणून बळीराजा संतापला… महावितरणला दिला इशारा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Ahmednagar News:- राहाता परिसरात सर्वच ठिकाणी कृषी पंपाची वीज सुरळीतपणे दिली जात नसल्यामुळे पाण्याअभावी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

महावितरणच्या आडमुठेपणामुळे शेतकरी त्रस्त झाले असून आता त्रासलेल्या या बळीराजाने महावितरणला इशाराच दिला आहे. राहाता परिसरात महावितरण कंपनीच्या सावळ्या गोंधळामुळे कृषी पंपाची शेतकर्‍यांना देण्यात येणारी वीज सुरळीत दिली जात नसल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

परिणामी विहीर व कुपनलिकेत पाणी असतानाही वीजपुरवठा सुरळीत मिळत नसल्यामुळे शेतातील पिके पाण्याअभावी करपू लागली आहे. परिसरात गहू, मका, पेरू, चिकू, डाळिंब, ऊस, द्राक्षे,

घास ही पिके शेतामध्ये उभी आहेत. उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पिकांना पाणी लवकर द्यावे लागते. शेतकरी पिके वाचविण्यासाठी धडपड करीत असताना महावितरणकडून देण्यात येणारी कृषी पंपाची वीज सुरळीतपणे मिळत नाही.

कृषी पंपाची वीज ही दिवस किंवा रात्री देण्यात येणार्‍या वेळापत्रकानुसार 8 तास सुरळीतपणे देण्याची योजना असतानाही दिवसा कृषी पंपासाठी मिळणारी वीज 8 तासांपैकी फक्त 3 ते 4 तास मिळते. महावितरण कडून शेतकर्‍यांना नेहमीच कृषिपंपाची वीज मिळत नाही.

बिल भरण्यासाठी महावितरण शेतकर्‍यांकडून सक्तीची वसुली करते. महावितरण कंपनीने कृषी पंपाची वीज सुरळीतपणे 8 तास तात्काळ देऊन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अन्यथा परिसरातील शेतकरी महावितरण कार्यालयाला लवकरच घेराव घालतील. असा इशारा बळीराजाच्या वतीने देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News