आतापर्यंत ५२ हजार ३६६ रुग्ण बरे होऊन परतले घरी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात आज १६८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ३६६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६९ टक्के इतके झाले आहे.

सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १५१७ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४२, जामखेड ०८, कर्जत १५, कोपरगाव ०१, नगर ग्रा १७, नेवासा ०६, पारनेर १०, पाथर्डी २६, राहुरी ०२, संगमनेर ०१, शेवगाव ३२, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:५२३६६

उपचार सुरू असलेले रूग्ण:१५१७

मृत्यू:८४१

एकूण रूग्ण संख्या:५४७२४

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

  • घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा
  • प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
  • स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या
  • अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा
  • खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका
  • माझेकुटुंबमाझी_जबाबदारी

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment