अहमदनगर Live24 टीम,17 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या संकटमय काळात कोरोनायोद्धा डॉक्टर्स अगदी प्रामाणिकपणे सेवा बजावत असतांना शनीशिंगणापूर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्सनी कामात हलगर्जीपणा करणे हे योग्य नाही.
संकटाशी लढताना ज्याच्यावर जी जबाबदारी असते त्याने ती कर्तव्य म्हणून पार पडलीच पाहिजे. युद्धभूमीवरील सैनिक युद्ध सुरू झाल्यावर रजेवर जात नाहीत ते संकटाशी लढतात हाच दृष्टिकोन डॉक्टरांनी स्वीकारला पाहिजे असे मत प्रशांत गडाख यांनी व्यक्त केले.
गडाख पुढे म्हणाले की, डॉक्टरांनी कोविड योद्धा म्हणून लढले पाहिजे त्यासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य पुरवण्याची जबाबदारी प्रशासनामार्फत माझी आहे. डॉक्टरांचा उपयोग फक्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी नसून ,त्यांना धैर्य व पाठबळ देणे हा पण आहे .
रुग्णांना हाच आधार मिळावा ,म्हणून मी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या भेटीला आलो आहे, असे सांगत सर्वासमक्ष प्रशांत गडाख यांनी पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधत आधार दिला यावेळी रुणांनी हॉस्पिलच्या वतीने ज्या सुविधा दिल्या जातात त्याबाबत समाधान व्यक्त केले.
प्रशांत गडाख यांनी कोरोनाला सामोरे जातांना हॉस्पिटल प्रशासन व आरोग्य विभाग यांनी समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना दिल्या.आपण सर्व मिळून ही सेवा जबाबदारीने पार पाडू व करोनाशी सामना करू हा आशावाद सर्वांना दिला. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता शंकरराव गडाख
यांनी स्वतः पुढाकार घेत शनिशिंगणापूर येथे शनैश्वर ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू केले. यामुळे नेवासा येथील कोविड सेंटरवर असलेला अतिरिक्त ताण दुर होऊन रुग्णांची हेळसांड दूर झाली आहे.असे प्रतिपादन प्रशांत गडाख यांनी केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved