काल कोरोना मुळे झाला इतक्या रुग्णांचा मृत्यू !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-नगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे आणखी चार जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या आता ९५७ झाले आहे, तर दिवसभरात नवे २६७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

नगर जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. नगर शहर व जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५० खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८६ आणि अँटीजेन चाचणीत १३१ रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा २३, अकोले ३, कर्जत ३, कोपरगाव २, नगर ग्रामीण ३, नेवासे ३, पारनेर ४, राहाता २, संगमनेर ४, श्रीगोंदे १, श्रीरामपूर १, कँटोन्मेंट २ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ३१, अकोले ३, कोपरगाव ३, नगर ग्रामीण ५, नेवासे १, पारनेर ९, पाथर्डी १, राहाता ६, राहुरी ७, संगमनेर १६, श्रीरामपूर ३, कँटोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे.अँटीजेन चाचणीत १२५ जण बाधित आढळून आले.

यामध्ये, अकोले ८, जामखेड १६, कर्जत ७, कोपरगाव १२, नेवासे ७ पारनेर ४, पाथर्डी ११, राहाता ९, राहुरी ६, संगमनेर २६, शेवगाव ९, श्रीगोंदे ९, श्रीरामपूर ६ आणि कॅन्टोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६४ हजार ४०६ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ६१ हजार ८४१ घरी सोडण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment