अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- शुक्रवारी दिवसभरात आणखी ५१५ रुग्ण आढळून आले, तर बारा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ७७१ झाली आहे. नऊ दिवसापूर्वी जिल्ह्यात बाधित संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाण काहीसे घटले होते.
मात्र दोन दिवसांपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १२ जणांचा मृत्यू झाला. साडेसहा महिन्यांत रुग्णांची संख्या ४९ हजार ६७८ झाली आहे.
शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना कोविड चाचणी प्रयोगशाळेत ११७, खासगी प्रयोगशाळेत १२६ आणि अँटीजेन चाचणीत २६८ बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयात मनपा ४५, अकोले १५, जामखेड ३, कर्जत ४, कोपरगाव ८, नगर ग्रामीण १४, नेवासे २, पारनेर ५, पाथर्डी 3, राहाता 3, राहुरी 3, श्रीगोंदे ६, मिलिटरी हॉस्पिटल ५ इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत मनपा ४६, अकोले १, जामखेड ३, कर्जत २, कोपरगाव २, नगर ग्रामीण १५, नेवासे ९, पारनेर ३, पाथर्डी ६, राहाता ९, राहुरी १२, संगमनेर ७, शेवगाव ३, श्रीरामपूर ८ रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत मनपा १७, अकोले १४, जामखेड २३, कर्जत १७, कोपरगाव ८, नेवासे ९, पारनेर १०, पाथर्डी ४६, राहाता १२, राहुरी १७, संगमनेर ५३, शेवगाव १४, श्रीगोंदे ७, श्रीरामपूर ११ रुग्णांचा समावेश आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved