अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकूण रुग्ण संख्या २९८ वर जाऊन पोहोचली आहे.
आंबेडकर वसतिगृहात करण्यात आलेल्या ६१ रॅपीड टेस्टमध्ये श्रीरामपूर तालुक्यात १६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
यात एका पोलिसांचा समावेश आहे. तसेच कोरोना बाधित असलेल्या रुग्णांपैकी १२ रुग्ण काल बरे होऊन घरी परतले आहेत. काल दुपारी रॅपीड टेस्ट तपासणीत ६१ जणांची तपासणी करण्यात आली.
१६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ४२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णात कारेगावात काल पुन्हा ६ रुग्ण आढळले आहेत तर खंडाळा ४,
गोंधवणी २, म्हाडा, वॉर्ड नं. २, वडाळा महादेव, टाकळीभान प्रत्येकी १ असे १६ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या संतलुक हॉस्पिटलमध्ये ४४ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून आंबेडकर वसतीगृहात १० जणांना ठेवण्यात आले आहेत.
श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत १२१६ जणांच्या घशाचे स्त्राव घेण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २९८ वर जावून पोहोचली आहे. तर ६९६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
करोनामुळे तालुक्यात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. रॅपीड टेस्टमध्ये आज जे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत
त्यांच्याशी संपर्कात आलेल्यांची आज तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती श्रीरामपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा