…म्हणून आमदार रोहित पवारांना द्यावा लागणार 3 कोटी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-जामखेड तालुक्‍यातील ४९ ग्रामपंचायतींपैकी सारोळा, आपटी, वाकी, खूरदैठण, पोतेवाडी या ग्रामपंचायती उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी बिनविरोध झाल्या होत्या, तर राजेवाडी, सोनेगाव, सातेफळ, धोंडपारगाव या पाच ग्रामपंचायती आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी बिनविरोध झाल्या.

त्यामुळे तालुक्‍यातील एकूण दहा ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली. दरम्यान निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी आमदार रोहित पवारांनी पुढाकार घेतला होता.

तसेच निवडणूक बिनविरोध झाली तर गावाला विकासनिधी म्हणून ३० लाख रुपये दिले जातील, असे आश्वसन त्यांनी यावेळी दिले होते.

पवारांच्या या आवाहनाला जामखेड तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींनी प्रतिसाद देत बिनविरोध निवडणुक केली आहे. तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींपैकी दहा गावे आता त्यांच्या बक्षिसास पात्र ठरले आहेत. आता प्रत्येकी 30 लाखांप्रमाणे जवळपास तीन कोटींचा निधी आ.पवारांना तयार ठेवावा लागणार आहे.

तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमधून ४१७ सदस्य निवडून दिले जाणार आहेत. यापैकी ११६ सदस्य बिनविरोध निवडून आल्याने केवळ ३०१ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment