कोरोना उपचार करताना ‘इतके’ डॉकटर पॉझिटिव्ह; व्यक्त केली ‘ही’ खंत

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. हजारोंच्या कोरोनाचे रुग्ण गेले आहेत. आज शासन सर्वाना घरत बसण्याची विनंती करत हे. संपर्ग टाळण्याचे आवाहन करत आहे.

परंतु या संकटात सर्वाना घरात सुरक्षित ठेवण्यासाठी काही कोरोना योध्ये जीवाची बाजी लावत २४ तास आपले कर्तव्य बजावत आहेत. वैद्यकीय विभाग यातील एक.

मागील चार महिन्यांपासून जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी ‘ डॉक्टर्स जीवाची बाजी लावून काम करत आहेत. रुग्णांची सेवा करणार्‍या 30 डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली तर दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सुरुवातीच्या काळात सिव्हील, बुथ आणि एम्स या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करण्यात आले. त्या काळात सिव्हील आणि बुथमध्ये संघटनेच्या मेडिसीन एमडी, भूलतज्ज्ञांनी आयसीयूमध्ये सेवा दिली.

जशीजशी रुग्ण संख्या वाढू लागली, तशी या रुग्णालयांतील बेडची संख्या कमी पडू लागली. त्यामुळे नोबेल, स्वास्थ्य, साईदीप यांनी खासगी कोव्हिड रुग्णालय सुरू केले.

त्यापाठोपाठ मॅककेअर, श्रीदीप, साईएशियन यांनी पतियाळा हाऊसध्ये कोव्हिड उपचार केंद्र सुरू केले. या काळात कोव्हिड व्यतिरिक्त इतर आजारांवरील उपचार रखडू नयेत, याचीही काळजी घेण्यात आली. विशेषत: गरोदर स्त्रियांवरील उपचार आणि प्रसूतीसााठी उपाययोजना करण्यात आल्या.

डॉक्टरांनी व्यक्त केली खंत-: आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे यांनी खासगी डॉक्टरांना बिलासंदर्भात नाहक टार्गेट केले जात असल्याची खंत व्यक्त केली आहे. खासगी हॉस्पिटलमधून 1 हजार 700 बाधित ठणठणीत बरे झाले आहेत . आयएमए या डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. आठरे व सचिव डॉ. सचिन वहाडणे यांनी पत्रक प्रसिध्दीस देत डॉक्टरांची बाजू मांडली आहे. यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात काम करणे धोक्याचे असतानाही खासगी वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स आपला व कुटुंबाचा जीव धोक्यात घालून करोना रुग्णांवर उपचार करत आहेत तरी देखील त्यांना टार्गेट केले जाते अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News