तेव्हा निळवंडेचे श्रेय घेणारे गप्प का होते?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2020 :- माजी मंत्री मधुकर पिचड यांनी ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ हे धोरण स्वीकारल्यानेच निळवंडे धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या योगदानातून धरणाची निर्मिती होऊ शकली.

निळवंडे धरणातून पाणी नदीपात्रात सोडल्याने कोकणेवाडीच्या बाजूने माती पात्रात पडत आहे. त्यामुळे त्या गावाला धोका होऊ शकतो. त्यादृष्टीने कोकणेवाडीच्या बाजूने सिमेंट काँक्रिटची भिंत बांधावी.

……………………………………………………………………..
जाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले अमृततुल्य या नामांकित चहाची सद्यस्थितीत तयार असलेली फ्रेंचायसी देणे ( विक्री ) साठी उपलब्ध आहे .
पत्ता :- प्रेम धन चौक महेंद्र पेढे वाला च्या समोर अहमदनगर
पहा फोटोज व लोकेशन पुढील लिंकवर https://bit.ly/3ggsEbn
फ्रेंचायसी साठी संपर्क :- आदि एन्टरप्रायजेस 9730197997, 9764855522, 9975167374
……………………………………………………………………….

प्रकल्पग्रस्तांचे उर्वरित प्रश्नही तातडीने मार्गी लावावेत. राष्ट्रवादीत असताना धरणग्रस्तांच्या प्रश्नांसाठी अनेक आंदोलने केली असून आज निळवंडेचे श्रेय घेणारे त्यावेळी गप्प का होते, असा सवाल माजी आमदार वैभव पिचड यांनी केला.

निळवंडे धरण भरल्याने गुरुवारी सकाळी धरणग्रस्त शेतकर्‍यांसमवेत पिचड यांनी साडीचोळी, श्रीफळ वाढवून जलपूजन केले. त्यांच्या हस्ते धरणाच्या भिंतीवरील प्रवेशद्वाराचेही उद््घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment