अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- सुमारे आठ महिन्यांपासून श्रीगोंदा पोलिसांच्या मदतीला राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) आजी आणि माजी विद्यार्थ्यांनी आहोरात्र काम करत असून श्रीगोंदा शहरातील गृन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यास मोठी मदत केली.
याच कामची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र राऊत यांची अहमदनगर जिल्हा पोलिस मित्र संस्थेच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याचे पत्र नुकतेच संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकांत क्षेत्रे यांनी दिले.
यावेळी क्षेत्रे म्हणाले की, कोरोना व्हायरसला प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तत्कालीन कर्जत उपविभाग पोलीस अधिकारी संजय सातव आणि तत्कालीन श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव
यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) आजी आणि माजी विद्यार्थी सुमारे आठ महिन्यांपासून विना मेहताना रात्रीची गस्त करत श्रीगोंदा शहराला सुरक्षा पुरवत आहेत.
यापुढेही आपले कार्य असेच चालू राहणार असून पुढील काळात इतर शासकीय कार्यालये, देवस्थाने, संस्था यांना सुरक्षा पुरवण्यासाठी संस्था काम करणार असल्याने श्रीगोंदा तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी पोलीस मित्र संस्थेचे सभासद होवून संस्थेच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन क्षेत्रे यांनी यावेळी केले.
यावेळी संस्थेचे नगर तालुकाध्यक्ष आकाश निकम तसेच किरण कळसे, सागर डहाळे, प्रथमेश वाळूंजकर, मंगेश होले, अक्षय काळे यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी राऊत यांच्या निवडीबाबत अभिनंदन केले असून तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेछा दिल्या आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- काय सांगता! आ.लंके यांच्या मतदारसंघात चक्क परदेशी नागरिकांचा मतदार यादीत समावेश
- रेखा जरे यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच संशयास्पद अपघातात एकाचा मृत्यू
- प्रेरणादायी ! ‘ती’चे अफाट कर्तृत्व; नोकरी सोडून केला ‘हा’ व्यवसाय, आता कमावतेय 30 लाख