अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-आरोग्य सहाय्यकडून ८० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या महिला जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रजनी रामदास खुणे यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
संगमनेर तालुक्यातील आरोग्य सहाय्यक हे १ सप्टेंबर २०१४ ते १६ जानेवारी २०१५ या दरम्यान आजारपणाच्या रजेवर होते. याकालावधीतील त्यांचे वेतन त्यांना मिळाले नव्हते.

ते वेतन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. खुणे यांनी मिळवून दिले. या खटल्यात तक्रारदार यांच्याकडून ८० हजाराची लाच घेताना डॉ. खुणे यांना लाचलुचपत विभागाच्या नगर पथकाने गुरुवारी अटक केली.
त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. डॉ.खुणे यांचा पुणे येथे बंगला त्या बंगल्याची तपासणी करणे बाकी आहे.
लाचेची रक्कम मोठी असून याबाबत अधिक तपास करणे बाकी असल्याचा युक्तिवाद लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक हरिष खेडकर यांनी न्यायालयासमोर केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved