तलवार बाळगल्याने दोघांसोबत झाले असे काही …

Published on -

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  तलवार बाळगणाऱ्या दोन तरुणांकडून तलवार जप्त करून पोलिसांनी सोमवारी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

घोडेगाव रस्त्यावरील महाराजा टिंबर दुकानासमोर एमएच १६ सीआर ५४९८ या मोटारसायकलीजवळ दोघे संशयास्पदरित्या दिसले.

पोलिस पाहून त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.

दत्तात्रय मच्छिंद्र मेहेत्रे (मेहेत्रे वस्ती, औटेवाडी) व आदिनाथ छगन हिरडे (हिरडेमळा) अशी त्यांची नावे आहेत.

हिरडेजवळ तलवार सापडली. ही तलवार उमेश वेताळ (लिंपणगाव)

याची असून त्याने परत मागितल्याने देण्यास चाललो असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान श्रीगोंदा पोलिसांनी तलवार व गाडी ताब्यात घेत या दोन्ही तरुणांवर गुन्हा दाखल केला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe