कचरा टाकल्याच्या कारणावरुन अहमदनगर शहरात झाले असे काही…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- कचरा टाकण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन चाकुने वार करुन गंभीर जखमी केल्याप्रकरणी फैय्याज अब्दुल कादर शेख व त्याची पत्नी यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सैफ मेहमूद शेख (रा.पिंगारा हॉटेल जवळ, नगर) यांच्यासह आई, वडील मेहमूद गनी शेख यांना जीवे मारण्याच्या हेतूने गळा, मान, मनगट व डोक्यावर चाकूने वार करुन फैय्याज अब्दुल कादर शेख व त्याची पत्नी यांनी गंभीर जखमी केले.

याप्रकरणी फैयाज शेख यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान फैयाज शेख यांनी सैफ शेख व ७ ते ८ जण यांच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीत म्हटले की ‘तू वर येवून शिव्या का देतोस’ असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment