वर्षात दामदुप्पटचे आमिष दाखवत सोनईत साडेसहा कोटीला गंडा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-मोठमोठ्या हॉटेलमध्ये बैठका घेवून आमच्या कंपनीत गुंतवलेले पैसे वर्षांत दुप्पट करून देवू त्यासह विमानाचा प्रवास शिवाय जमीन मिळवून देवू, अशी एकना अनेक फायद्याची अमिषे दाखवून सोनई येथील शेतकऱ्याला सुमारे ६ कोटी ८१ लाख रुपयाला गंडा घालण्याचा प्रकार उघड झाला आहे.

याबाबत अण्णासाहेब मिठू दरंदले, वय ५१ धंदा शेती रा. सोनई, ता. नेवासा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की,२०१७ ते. २०१९ या कालावधीमध्ये आरोपी यांनी

संगनमत करुन स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता फिर्यादी अण्णासाहेब दरंदले आणि त्यांच्या कुटुंबातील व मित्र परिवारातील लोकांची आर्थिक फसवणुक करण्याच्या उद्देशाने उज्वलम अँग्रो मल्टीस्टेट को-ऑप सोसायटी,

माऊली मल्टीस्टेट क्रेडीट को-ऑपरेटीव्ही सोसायटी, संकल्प सिद्धी इंडिया प्रा. लि. प्रॉफीट टिचर फ्याय हॉलिडे या वेगवेगळ्या संस्थांची फिर्यादी व साक्षीदार यांना वरील ठिकाणी बोलावुन बैठक घेवून सांगितले की,

सदर संस्थेत गुंतवलेले पेसे एका वर्षात दामदुप्पट करु याशिवाय विमान प्रवास जमिनीचा भाग तुम्हाला मिळवून देवू, सहली करू व इतर आर्थिक फायदे होतोल,

असे आमिष दाखविले व विश्वास संपादन करुन मुदत पूर्ण होवूनही फिर्यादी व साक्षीदार यांनी वेळोवेळी भरणा केलेली रक्कम ६ कोटी ८१ लाख २८ हजार ९८३ रुपये स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी आरोपींनी अपहार करून फसवणुक करुन विश्‍वासघात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अण्णासाहेब मिठू दरंदले यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलिसांनी विष्णू रामचंद्र भागवत, रा. दवंडगाव, ता. येवला, जि. नाशिक, निलेश जनार्दन कुंभार, मु. पो. मंचर,

ता. आंबेगाव, जि. पुणे, सुरेश सीताराम घंगाळे, रा. तळेगाव, ता. मावळ, जि. पुणे, राजेंद्र वामनराव देशमुख, प्रविण गंगाधर कवडे, रा. कोतुळ, ता. अकोले,

शांताराम अशोक देवतरसे, रा. कऱ्हे वस्ती, पोस्ट सोनई, ता. नेवासा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि करपे हे करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment