सभापती गडाख म्हणतात, पशुवैद्यकांनी जादा सेवाशुल्क आकारल्यास…

Published on -

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पशुधन असून या पशुधनला जिल्हा परिषदेकडील पशुवैद्यक आणि खासगी वैद्यक यांच्याकडून सेवा पुरविण्यात येत आहे.

शेतकर्‍यांच्या पशूला पूरविण्यात येणार्‍या सेवांचे दर शासनाकडून निश्चित करून देण्यात आलेले आहेत. परंतु सध्या हे पशुवैद्यक जास्त सेवाशुल्क आकारणी करत आहेत.

यामुळे जादा शुल्क आकारणी करणार्‍या जिल्ह्यातील पशुवैद्यक यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या पशूसंवर्धन विभागाने घेतला आहे.

तसेच जादा शुल्क घेणार्‍यांची नावे जिल्हा परिषदेला कळवा, असे आवाहन सभापती सुनील गडाख यांनी जिल्ह्यातील शेतकरी आणि पशुपालकांना केले आहे.

शुक्रवारी जिल्हा परिषद पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीची सभा सभापती गडाख यांचे अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली.

यावेळी काही तालुक्यांमध्ये अजूनही पशूधनाचे घटसर्प, फर्‍या रोग प्रतिबंधक लसीकरण शंभर टक्के पूर्ण झालेले नाही. येत्या आठ दिवसांमध्ये हे दोन्ही प्रकारचे लसीकरण पूर्ण करावेत,

अशा सूचना पंचायत समिती स्तरावरील पशूसंवर्धन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना देण्यात आल्या आहेत. तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने 31 जुलैपर्यंत अर्ज मागवले होते.

परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लाभधारकांना हे शक्य झाले नाही. त्यामुळे अशांसाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून देण्यात आलेली आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!