Ahmednagar News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील प्रत्येक मतदारसंघांमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी वाढू लागली असून आपल्यालाच तिकीट मिळावे याकरिता प्रत्येक नेतेमंडळी कडून मोर्चेबांधणी सुरू असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.
याकरिता आता पक्षांच्या माध्यमातून मुलाखतींचे आयोजन करण्यात आलेले असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भाजप तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षांच्या माध्यमातून घेण्यात येत आहेत. अगदी याच प्रकारच्या मुलाखती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माध्यमातून पुण्यामध्ये घेण्यात आल्या.
विशेष म्हणजे या मुलाखतीत स्वतः शरद पवार यांनीच घेतल्या. या मुलाखती दरम्यान मात्र नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदार संघातील उमेदवारीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच असल्याचे दिसून आले.
या तालुक्यातून अनुराधा नागवडे यांचेही नाव पवारांच्या पक्षात मुलाखतीच्या यादीत होते व त्यासोबतच पारनेर तसेच राहुरी, शेवगाव पाथर्डी तसेच कर्जत जामखेड या मतदारसंघात मात्र हवी तेवढी स्पर्धा दिसून आली नाही.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा आणि अकोलेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तिकिटासाठी जोरदार रस्सीखेच
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मुलाखतीत मतदारसंघातील श्रीगोंदा उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे. या तालुक्यात अनुराधा नागवडे यांचेही नाव पवारांच्या पक्षात मुलाखतीच्या यादीत होते. पारनेर, राहुरी, शेवगाव-पाथर्डी, कर्जत-जामखेड या मतदारसंघात मात्र स्पर्धा दिसली नाही.राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या पुण्यात मुलाखती झाल्या.
स्वतः शरद पवार यांनी मुलाखती घेतल्या. फौजिया खान, खासदार निलेश लंके यावेळी उपस्थित होते. सायंकाळी साडेपाचनंतर या मुलाखती झाल्या. श्रीगोंदा मतदारसंघातून मुलाखतीसाठी माजी आमदार राहुल जगताप, बाबासाहेब भोस, निवास नाईक, अण्णासाहेब शेलार, अनुराधा नागवडे यांची नावे यादीत होती.
अनुराधा नागवडे व त्यांचे पती राजेंद्र नागवडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेला आहे. त्यांचे नाव शरद पवार गटाच्या इच्छुकांच्या यादीत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या, पण, त्या मुलाखतीच्या वेळी हजर नव्हत्या. या मतदारसंघात टिळक भोस यांनीही मुलाखत दिली.
पारनेर विधानसभा मतदारसंघातून खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचेही नाव इच्छुकांच्या यादीत होते. परंतु, त्याही उपस्थित नव्हत्या. पारनेरमधून रोहिदास कर्डिले, माधव लामखडे यांनीही मुलाखती दिल्या.
शहरातून माजी महापौर अभिषेक कळमकर, डॉ. अनिल आठरे, शौकत तांबोळी यांनी मुलाखती दिल्या. शेवगाव-पाथर्डीतून प्रताप ढाकणे व विद्या गाडेकर यांनी मुलाखती दिल्या.
राहुरीतून प्राजक्त तनपुरे यांचा एकमेव अर्ज होता.ते मुलाखतीला अनुपस्थित होते. कोपरगावमधून संदीप वर्षे, रणजित बोठे, दिलीप लासुरे यांनी अर्ज दाखल केले होते. अकोले मतदारसंघातून अमित भांगरे व मधुकर तळपाडे यांची नावे होती.