अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात सध्या दरदिवशी आंदोलने सुरु आहे. प्रलंबित प्रश्न, विविध मागण्या, निदर्शन, निवेदन यासाठी आंदोलनाचा सपाटा सध्या जोरात सुरु आहे.
त्यातच आहे नेवाशामध्ये वाघ्या – मुरळी आंदोलन करण्यात आले. वाघ्या-मुरळी यांना पेन्शन सुरू करा,’ यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी (ता. 8) महाराष्ट्र राज्य वाघ्या-मुरळी परिषदेतर्फे नेवासे
येथील खोलेश्वर गणपती चौकात जागरण-गोंधळ घालून आंदोलन केले. नेवाशाचे तहसीलदार रूपेश सुराणा यांना वाघ्या-मुरळी लोककलावंतांतर्फे निवेदन देण्यात आले.
त्यात म्हटले आहे, की सर्व लोककलावंतांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च शासनामार्फत करण्यात यावा, लोककलेला सरकारदरबारी अधिकृत मान्यता मिळवून नोंदणी करावी,
कलावंतांच्या निवासासाठी शासनाकडून जमीन, घर स्वरूपात विशेष योजना मंजूर करण्यात यावी, वाघ्या-मुरळी यांना पेन्शन योजना सुरू करण्यात यावी व महाराष्ट्रातील लोककलावंतांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.
या आंदोलनात वाघ्या-मुरळी परिषदेचे जिल्हाध्यक्ष भास्कर मासाळ, तालुकाध्यक्ष लक्ष्मण नजन, गंगापूर तालुकाध्यक्ष अनिल दुधे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष एकनाथ मासाळ, सर्जेराव बेडके यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved