राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने उपायुक्तांना निवेदन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमध्ये अडीच ते तीन महिन्यापासून कापड बाजार येथील पथारी व फेरीवाले यांचे व्यवसाय बंद असून, पथारी व फेरीवाल्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असताना त्यांना व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन मनपा उपायुक्त डॉ.प्रदिप पठारे यांना निवेदन देण्यात आले. तसेच आमदार संग्राम जगताप यांच्याशी सदर प्रश्‍नी चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, नवेद शेख, नदिम शेख, सलीम बागवान, शरीफ शेख, वसिम शेख, साजीद खान, सुफियान शेख आदींसह कापड बाजार येथील पथारी व फेरीवाले उपस्थित होते.

कापड बाजार येथील भिंगारवाला चौक ते तेलीखुंट चौक दरम्यान पथारी व फेरीवाले पिढ्यानपिढ्या विविध वस्तू आणि रेडीमेड कपडे विक्री करुन हातावर पोट भरत आहे. या व्यवसायावर त्यांच्या कुटुंबीयांवर उदरनिर्वाह चालत असतो.

परंतू लॉकडाऊन मध्ये हा व्यवसाय अडीच ते तीन महिन्यापासून बंद आहे. कापड बाजार येथे दुकानदारांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मात्र पथारी व फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास अजूनही परवानगी दिली गेली नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून, गंभीर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे.

कुटुंबाचा उदरनिर्वाह मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न देखील बिकट बनला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व नियमावली व फिजीकल डिस्टन्सचे पालन करणार असल्याचे स्पष्ट करुन, लवकरात लवकर कापड बाजार येथील पथारी व फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर पथारी व फेरीवाल्यांचे व्यवसाय ठप्प असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असताना त्यांना व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने मनपा उपायुक्त डॉ.प्रदिप पठारे यांना देण्यात आले.

यावेळी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, नवेद शेख, नदिम शेख, सलीम बागवान, शरीफ शेख, वसिम शेख, साजीद खान, सुफियान शेख आदि.

लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर पथारी व फेरीवाल्यांचे व्यवसाय ठप्प असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असताना त्यांना व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली.

यावेळी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, नवेद शेख, नदिम शेख, सलीम बागवान, शरीफ शेख, वसिम शेख, साजीद खान, सुफियान शेख आदि.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarl

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment