पेट्रोलची चिंता सोडा…बॅटरीवरील ई दुचाकी आता नगरमध्येच दाखल… एकदा चार्ज केल्यावर १२० किमीची राईड !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- पेट्रोलचे वाढणारे दर पाहता आता बॅटरीवर चालणाऱ्या ई स्कूटर, ई बाईक्सकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. सरकारकडूनही ई दुचाकी वाहनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. नगरमध्ये आनंदधाम परिसरातील महात्मा फुले चौकात महावीर ई बाईक्स हे इलेक्ट्रिक दुचाकींचे नवीन शोरुम खुले होत आहे.

हैदराबाद येथील प्युअर ईव्ही या कंपनीच्या ई स्कूटर, तसेच बॅटरीवरील सायकल येथे उपलब्ध आहेत. मंगळवारी (३ नोव्हेंबर) महावीर ई बाईक्स शोरुम ग्राहकसेवेत दाखल होत असल्याची माहिती शोरुमचे संचालक ऋषभ संतोष दुगड यांनी दिली. महावीर ई बाईक्स शोरुमचे उद्घाटन माणिकचंद उद्योग समूहाचे प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते होणार आहे.

याप्रसंगी आमदार संग्राम जगताप, श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत, बडीसाजन ओसवाल श्रीसंघाचे अध्यक्ष विलास लोढा, नगरसेवक गणेश भोसले, विपुल शेटिया, प्रकाश भागानगरे, मीनाताई चोपडा, धनेश कोठारी आदी उपस्थित असतील. बॅटरीवरील गाड्या पेट्रोलपेक्षा दमदार व किफायतशीर आहेत.

प्युअर ईव्ही कंपनीची जिल्ह्याची एकमेव डिलरशिप महावीर ई बाईक्सकडे आहे. ई-स्कूटरचे चार मॉडेल सहा आकर्षक रंगसंगतीत उपलब्ध आहेत. ई प्लुटो, ई प्लुटो ७ जी, एंट्रस प्लस, मोपेड ही चार मॉडेल सर्व वयोगटाला आवडतील, अशी आहेत. रेग्युलर तसेच बॅटरीवर चालणारी इट्रॉन प्लस सायकलही आहे.

सर्व दुचाकींसाठी मजबूत लिथियम बॅटरीचा वापर केलेला असून बॅटरीवर तीन वर्षांची वाॅरंटी देण्यात येते. किमान चार तास बॅटरी चार्जिंग केल्यावर सुमारे ७० ते १२० किलोमीटर बिनधास्तपणे दुचाकी चालते. पेट्रोलच्या तुलनेत चार्जिंगचा खर्च अतिशय कमी आहे. १५ ते २० पैसे प्रतिकिलोमीटर खर्चात या ई दुचाकीची राईड करता येते.

नामांकित कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध आहे. लवकरच या कंपनीच्या ई बाईक्सही शोरुममध्ये दाखल होत असल्याचे दुगड यांनी सांगितले. अधिक माहिती व टेस्ट ड्राईव्हसाठी संपर्क ८४८३००५९६९/९६०४००८६९०

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment