Ahmednagar News : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात चापडगाव, मंगरुळ, बेलगाव, आंतरवाली, परिसरात वादळ वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार चारा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
आगोदरच कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने हतबल झालेल्या बळीराजाच्या डोळ्यांत पाणी आले असताना त्यात अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या पदरी निराशा दिसून येत आहे.

Ahmednagar News
चैत्र पौर्णिमेला ग्रामीण भागात गावोगावी सालाबादप्रमाणे यात्रा उत्सव भरत आसतात, या वेळी बाहेरगावी असलेले सर्व ग्रामस्थ गावी येऊन मोठा उत्सव आनंदाने पार पडत असत;
परंतु यावर्षी अवकाळीने यात्रेकरूंच्या हाल झाले. राज्य शासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देऊन दिलास द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.