अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या संकटामय काळात जनतेच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटणाऱ्या शेवगाव नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांचे पगार थकविण्यात आले आहे.
दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर येऊन देखील पगाराविना कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहे. या कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आंदोलकांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिथे निष्काळजी पणा करणारे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील तर तिथे या गोष्टी होणे देखील स्वाभाविकच आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही. तालुक्याच्या आमदार मोनिका राजळे यांना विनवण्या करून देखील जर कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटणार नसेल तर अशा आमदारांचा काय उपयोग असा संतप्त सवाल कर्मचारी करू लागले आहे.
दरम्यान या कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या प्रश्नासाठी आमदार मोनिका राजळे यांच्या कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलनासाठी निघालेल्या विविध संघटना व पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी आखेगाव रस्त्यावरच अडविले. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी (स्व.) गोपीनाथ मुंडे चौकात थाळीनाद आंदोलन केले.
त्यानंतर पोलिसांनी वंचित बहुजन आघाडी, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. काही वेळाने त्यांना सोडण्यात आले. आमदार मोनिका राजळे यांच्या मतदार संघातील शेवगाव नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना स्वतःच्याच पगारासाठी आंदोलन करावे लागत आहे,
तर दुसरीकडे जामखेड नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेत तात्काळ मार्गी लावला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved