केडगावात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद या कुत्र्यांनी केले असे काही …!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-एकीकडे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्याने धुमाकूळ घातला असून दुसरीकडे शहरात मात्र भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. केडगाव देवी परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांनी पहाटे पाच शेळ्यांचा फडशा पाडला.

परिसरातील नागरिकांना प्राथमिक बिबट्या असल्याचेच वाटले परंतु या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिल्यानंतर हा हल्ला भटक्या कुत्र्यांनी केल्याचे समजले.

या घटनेची माहिती मिळातयानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली असून, परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

भटक्या कुत्र्यांचा केडगाव परिसरामध्ये वावर जास्त वाढला असून, महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. परिसरातील नागरिकांकडून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!