जनसामान्यांच्या कामांना प्राधान्य देत काँग्रेस पक्ष आणखी मजबूत करा – आ.डॉ.तांबे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्हा हा पुरोगामी व काँग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. काँग्रेस हा गोरगरिबांच्या विकासाचा विचार असून तो जनसामान्यांमध्ये अजूनही कायम आहे.

कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचून काँग्रेसचा विचार समजून सांगत लोक कल्याणाची कामे प्राधान्याने करत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करावी असे आवाहन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथिगृहावर

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित उत्तर विभागाच्या तालुक्यातील विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके होतेतर समवेत आमदार लहू कानडे, इंद्रजीतभाऊ थोरात, तालुकाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, अहमदनगर शहराध्यक्ष किरण काळे,

कार्याध्यक्ष सचिन गुजर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल भैय्या वाबळे , समन्वयक -ाानदेव वाफारे, -ाानेश्‍वर मुरकुटे , डॉ. एकनाथ गोंदकर, सौ. लताताई डांगे, संभाजी माळवदे, राहाता तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे, सेवादलाचे अध्यक्ष सुरेश झावरे, सुभाष सांगळे, विश्‍वासराव मुर्तडक, अरुण पाटील, तुषार पोटे ,

दादा पाटील वाकचौरे किशोर भनगे, कार्लेस साठे, राजेंद्र वाघमारे, नितीन शिंदे, संजय छल्लारे, अंकुश कानडे आदी उपस्थित होते. यावेळी श्रीरामपूर, राहाता, नेवासा, कोपरगाव, संगमनेर, अकोले येथील विविध काँग्रेस सेलचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी तालुकानिहाय विविध सेलचा संघटनात्मक आढावा घेण्यात आला.

या प्रसंगी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, काँग्रेस पक्षाला मोठी समृद्ध परंपरा असून या पक्षाने कायम गोरगरिबांच्या विकासाचा विचार केला आह. सर्व धर्म समभाव व लोकशाहीवर विश्वास असणार्‍या या पक्षाला मानणारा देशात मोठा वर्ग आहे.

तरुणांना काँग्रेस पक्षात मोठी संधी असून आता प्रत्येकाने हा विचार खेडोपाडी तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक सक्षमतेने काम करावे. जर विकासाची व लोककल्याणाची कामे प्राधान्याने केल्याने पक्षाची संघटनात्मक ताकद वाढणार आहे.

शेतकरी व लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर मोठे आंदोलन उभे आहे रायात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला झळाळी मिळाली असून हा पक्ष अधिक सक्षमतेने काम करत आहे.

सर्व कार्यकर्त्यांनी यापुढील काळात जन सामान्यांची कामे करत पक्ष संघटन मजबूत करावे असे आवाहन त्यांनी केले. तर आमदार लहू कानडे म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. पक्षाप्रती असलेली निष्ठा व बांधिलकी तुम्हाला यश मिळवून देईल.

आजही लोकांमध्ये काँग्रेसकडून मोठी अपेक्षा आहे. कार्यकर्त्यांनी पदाची अपेक्षा न करता अधिकाधिक संघटनात्मक काम करताना जर विकासाची कामे करावे असेही ते म्हणाले.अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर नगर जिल्ह्यात हा पक्ष आगामी काळात अधिक सक्षम एक नंबरचा दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके म्हणाले की,

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात गाव तेथे शाखा सुरु करतांना जिल्ह्यामध्ये पुन्हा काँग्रेस पक्षाला वैभव मिळवून देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने काम करावे. रायात काँग्रेस पक्ष सत्तेवर असून पक्षा च्या माध्यमातून आपल्याला विकासाची अधिक कामे करता येतील.

म्हणून कार्यकर्त्यांनी नवी संधी समजून काम करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी डॉ. एकनाथ गोंदकर, लताताई डांगे ,श्रीकांत मापारी , संभाजी माळवदे , -ाानेश्‍वर मुरकुटे रावसाहेब बोठे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कैलास वाकचौरे, अ‍ॅड.समीन बागवान,अमृत गायखे, राजेंद्र निर्मळ, बाळासाहेब चव्हाण,गणपतराव सांगळे,

इंद्रभान थोरात, राजेंद्र वाघमारे, शोभा निगुर्डे, सुनिल साळुंखे, शितल देशमुख, मिनानाथ पांडे, आसिफ तांबोळी, सौ.निर्मलाताई गुंजाळ, आनंद वर्पे, सोमेश्‍वर दिवटे, कचरु पवार, सौ.प्रमिलाताई अभंग, सौदामिनी कान्हौरे, भास्कर शरमाळे, निखिल पापडेजा आदिंसह 6 तालुक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment