अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :रुग्णाचा मृत्यू झाल्याचे सांगितल्यानंतर गोंधळ घालणाऱ्या नातेवाईकांना गोंधळ घालू नका. असे सांगितल्याने त्यांनी डॉक्टरला मारहाण करून रुग्णालयातील साहित्याची तोडफोड केल्या प्रकरणी पोलिसांनी पाच जनावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील खर्डा येथील एक युवकाने गळफास घेतला होता, त्या रुग्णास तातडीने खर्डा येथून तातडीने ग्रामीण रुग्णालयातील जामखेड येथे उपचारासाठी आणले होते.
यावेळी डॉ.रवींद्र टाकसाळ यांनी त्या रुग्णाला तातडीने तपसून सोबत आलेल्या नातेवाईकांना रुग्ण सुजित अनिल चव्हाण हे मयत झाले असल्याचे सांगितले. दरम्यानच्या काळात सदर मयताचे वरील नातेवाईकांनी दवाखान्यात गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
त्या वेळेस त्यांना तुम्ही दवाखान्यात गोंधळ घालतात अशी विचारणा केली असता, त्यावेळेस त्या लोकांनी मला शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की, करून ग्रामीण रुग्णालयातील खोलीचा दरवाजा व रुग्णासाठी सॅनिटायझर बसवलेले मशीन फोडून नुकसान करीत असताना
रुग्णालयातील कर्मचारी त्यांना समजावून सांगत असताना त्यां कर्मचार्याना देखील त्या लोकांनी शिवीगाळ,दमदाटी करून मारहाण केली.तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांना देखील शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की केली.
त्यानुसार डॉ. रवींद्र टाकसाळ यांनी शासकीय कामात अडथला आणला म्हणून ५ जणांना विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यावरून जामखेड पोलीसानी सुरज विलास पवार,सागर धुलचंद पवार, अभिजीत अनिल चव्हाण, निवृत्ती गोरख चव्हाण, नीरज वसंत कसबे, व इतर दोन-तीन (सर्व रा. खर्डा ) यांच्यावर शासकीय कामात अडथला आणल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील करत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews