अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेमधील छात्रांची भारतीय सेनादलामध्ये निवड झाली.
यात ज्युनिअर अंडर ऑफिसर विष्णू उगलमुगले, महेश लोकरे, सार्जेंट विष्णू कुत्तरवडे, ऋषिकेश कारखेले, कॅडेट अक्षय कुटे, कॅडेट शशिकांत गर्जे, कॅडेट सौरभ लवांडे, कॅडेट गंगाधर महाजन, कॅडेट जनार्धन कराड, कॅडेट नितीन डांगे यांचा समावेश आहे. या सर्वच छात्रांनी अतिशय धैर्य व चिकाटीने यश संपादन केले आहे.
विशेष म्हणजे सर्व छात्र हे गरीब व शेतकरी कुटुंबातील आहेत. या सर्व यशस्वी छात्रांना कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे, एडम ऑफिसर कर्नल विनय बाली, सुभेदार मेजर लेफ्टनंट व्यंकटेश, कॅप्टन डॉ. अजयकुमार पालवे यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व राष्ट्रीय छात्र सेनेमधील छात्रांचे पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष सुरेश आव्हाड, प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांनी अभिनंदन केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved