Ahmednagar Politics : आनंदात खोडा घालणाऱ्यांकडून प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी !

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar Politics : काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून येथील हॅप्पी हायवेच्या चौपदरीकरणासह पथदिवे व सुशोभीकरणाचे काम झाले. हॅपी हायवेच्या आनंदात संपूर्ण शहरवासीय सहभागी झाले.

मात्र काही लोकांना हा आनंद पहावत नसल्याने त्यांनी लाईट बंद करण्यासाठी अनेक उद्योग केले. चांगल्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. आज तेच लोक लाईट चालू करण्यासाठी निवेदन देतात ही प्रसिद्धीसाठी केवीलवाणी स्टंटबाजी असल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

याबाबत दिवटे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गणेशोत्सवाच्या काळामध्ये आमदार थोरात यांच्या संकल्पनेतून संपूर्ण शहरवासीय एकत्र येत हॅपी हायवेचा मोठा आनंद सोहळा पार पडला.

आमदार थोरात यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून महाविकास आघाडी सरकारकडून ४० कोटी रुपये मिळवले. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वैयक्तिक संबंधातून २५ कोटी रुपये मिळवले. या दोन्ही निधीतून हॅपी हायवे झाला आहे..

संगमनेरकरांचा उत्सव व आनंद काही लोकांना पहावला नाही. त्यांनी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर करत अधिकाऱ्यांना दमदाटी करून हे पथ दिवे बंद ठेवण्यासाठी षडयंत्र केले. तेच लोक आज पथदिवे सुरू करण्यासाठी निवेदन देत आहेत.

यासाठी पत्रकबाजी

जावेद जहागीरदार यांनी फक्त प्रसिद्धीसाठी पत्रक बाजी केली आहे. कोणतीही माहिती न घेता त्यांचे पत्रक हे तथ्यहीन आहे. कॉटेज हॉस्पिटल बंद नसून ते कार्यान्वित असलेले शहर आरोग्य केंद्र आहे.

उपजिल्हा रुग्णालयासाठी आमदार थोरात यांचाच पाठपुरावा आहे. ज्यांना जनतेशी काही घेणे-देणे नाही. असे लोक प्रसिद्धीसाठी पत्रक बाजी आहेत. हे जनतेला माहित असल्याची टीका अल्पसंख्यांक शहराध्यक्ष जावेद शेख यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe