जिल्ह्यात दीड हजाराहून अधिकांचे लसीकरण यशस्वी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-कोरोना विषाणूला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी व नागरिकांना या विषाणूच्या प्रदूरभावापासून संरक्षित करण्यासाठी 16 जानेवारीपासून नगर जिल्ह्यात कोरोना लसीकरण सुरु करण्यात आले आहे.

दरम्यान याच अनुषंगाने जिल्ह्यात 650 आरोग्य कर्मचार्‍यांना मंगळवारी दिवसभरात कोरोनाची लस देण्यात आली. यामुळे आतापर्यंत कोरोनाची दिलेल्यांची संख्या आता 1 हजार 521 झाली आहे. मंगळवारी लस घेतल्यानंतर कोणालाही त्रास झाला नसल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोना लसीकरण

  • जिल्हा रुग्णालयात 67,
  • पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात 33,
  • कर्जत 67,
  • शेवगाव 43,
  • श्रीरामपूर 72,
  • राहाता 45,
  • संगमनेर 57,
  • अकोले 47 नगर मनपा हद्दीत – 219

आरोग्य यंत्रणेतील कर्मचार्‍यांना कोरोनाचा डोस देण्यात आलेा आहे. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यात 152 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe