अशीही फसवणूक ! खात्यातून ‘असे’ लांबवले 40 हजार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- साध्याचा जमाना हा ऑनलाईनचा जमाना आहे. सध्या अनेक व्यवहारही डिजिटल पद्धतीने होत आहेत. परंतु यामधून अनेक फसवणुकीचे प्रकार घडत असतात.

अनेकदा फसवणूक होऊन गुन्हेगार सापडत नाहीत. आता असाच एक प्रकार संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील इंडियन ओवरसीज बँक शाखेतील ग्राहकाच्या बाबतीत झाला आहे. त्याच्या खात्यामधून परस्पर 40 हजार रुपये लंपास झाले आहेत. शशिकांत नामदेव गुंजाळ असे या खातेदाराचे नाव आहे.

अधिक माहिती अशी: सदर बचत खात्यातून 24 ऑक्टोबर 2020 रोजी 40 हजार रुपये व दि. 26 ऑक्टोबर 2020 रोजी तीनवेळा दहा – दहा हजार असे 30 हजार असे मिळून दोन दिवसांत एकूण 40 हजार रुपये परस्पर लंपास करण्यात आले. बँकेच्या प्राथमिक अहवालानुसार सदर व्यवहार मध्यप्रदेशातील सिंघरुली येथून करण्यात आलेले असून

येस बँक बीसीकडून आधार क्रमांकाद्वारे ही रक्कम काढण्यात आल्याचे इंडियन ओवरसीज बँकेच्या व्यवस्थापनाने श्री. गुंजाळ यांच्या तक्रारीवर मेलद्वारे दिलेल्या उत्तरात नमूद केले आहे. कुणीही आपले फिंगर प्रिंट (बोटाचे ठसे) प्रत्यक्षात घेतलेले नाही.

मात्र आधार नंबरचा दुरुपयोग करून आपल्या बँक खात्यातून परस्पर 40 हजार रुपये काढण्यात आले. रक्कम काढण्यासाठी ओटीपी आला नाही किंवा रक्कम काढली गेली याबाबत आपल्या मोबाईल क्रमांकावर मेसेजही आला नाही. नेटबँकिंगद्वारे लॉगीन केले असता हा प्रकार आपल्या लक्षात आला, असे शशिकांत गुंजाळ यांनी सांगितले.

याप्रकरणी आपण इंडियन ओवरसीज बँक शाखेकडे, बँकेच्या वरिष्ठांकडे व अहमदनगर येथील सायबर सेल पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment