अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव-कमालपुर रस्त्यावरील माळवाडगाव शिवारातील भागचंद आसने यांचा अडीच एकर, मिराबाई कडुबा आसने यांचा दिड एकर तर नंदा गोरक्षनाथ आसने यांचा ३० गुंठे ऊस शॉर्टसर्कीटमुळे जळाला आहे.
वीजवितरणच्या गलथान कारभारामुळे या शेतकऱ्यांचे पाच लाखांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.माळवाडगाव शिवारातील कमालपुर रस्त्यावर भागचंद आसने, मिराबाई कडुबा आसने,
नंदा गोरक्षनाथ आसने यांच्या उसाच्या शेतात विजवितरणच्या तारांचे मोठे जाळे आहे. या वीज वाहक तारा पूर्णपणे लोंबकळल्याने आसने यांनी विजवितरणच्या अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली होती.
मात्र, याकडे स्थानिक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने शेतकऱ्यांनी नुकसान झाले आहे. याबाबत असंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारी असतांना अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नसल्याने विजवितरणच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
आज शेतपिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. परंतु, कोणाचा जिव गेल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved