ऊस तोडणी मजुर महिलेची श्रीगोंद्यात आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-श्रीगोंदा तालुक्यात तांदळी येथे शेतात उसतोड करणाऱ्या मजुराच्या पत्नीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी येथील शेतकरी चांदभाई गुलाब शेख यांच्या मोकळ्या शेतामध्ये पालं टाकून राहत असलेले, दिनकर शंकर चव्हाण (राहणार तळवण तांडा, ता.भडगाव, जि.. जळगाव) हे भाऊ व पत्नी सह नमूद ठिकाणी मागील दोन महिन्यांपासून राहत होते.

काही दिवसांपूर्वी दिनकर व त्याच्या पत्नी मध्ये किरकोळ वाद झाले होते. या वादातून पत्नीने थेट टोकाचे पाऊल उचलले. चव्हाण यांच्या पत्नीने भांडणाचा राग मनात धरून विषारी औषध प्रश्न करून आपली जीवनयात्रा संपवली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment