राहत्या घरात गळफास घेत केली आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-घरचे बाहेर गेल्याचे पाहत रहात्या घरामध्ये पंख्याच्या छताला गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार जामखेड शहरातील मोरे वस्तीवर घडला आहे.

विशाल ठाकरे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, मयत विशाल ठाकरे हा वॉटर फिल्टरचा व्यवसाय करीत होता. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी व मुले हे नातेवाईकांकडे बाहेरगावी गेले होते.

आज सकाळी मयत विषाल ठाकरे याची आजी त्याला पहायला त्याच्या बंगल्यात आली होती त्या वेळी आवाज देऊनही प्रतीसाद मिळत नव्हता, म्हणून तीने खिडकीच्या आत डोकावून पाहिले त्या वेळी विशालने गळफास घेतला आसल्याचे लक्षात आले.

धक्कादायक बाब म्हणजे विशाल याने मागिल काही दिवसांपुर्वी देखील औषध पीऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याच्यावर तातडीने उपचार केल्याने तो या घटनेत बचावला होता. मात्र पुन्हा काही दिवसातच घरातील छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आसल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समजु शकले नाही. यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe