अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-२३ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे घडला आहे.
प्रथमेश दीपक राउत वय २३ रा. घुलेवाडी असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी घरात कोणीही नसताना प्रथमेश राउत याने घराची आतून कडी लावून घेतली.
आणि दोरीच्या सहायाने गळफास घेत आपले जीवन संपविले. काही वेळानंतर घरातील व्यक्तीनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र घरातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता ही घटना समोर आली.
घरच्यांनी त्याला दवाखान्यात नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या घटनेची माहिती समजताच सहायक पोलीस निरीक्षक साबळे व सहकारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. प्रथमेश याने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved