सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अत्याचार, छेडछाड, विनयभंग अशा घटना घडू लागल्याने महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.

असाच एक धक्कादायक प्रकार आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात घडला आहे. जामखेड तालुक्यातील आरोळे वस्ती येथील विवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, जामखेड शहरातील आरोळे वस्ती येथे विवाहितेचा छळ आरोपी पती परशुराम यादव लोखंडे, यादव लोखंडे सासरे, ताई यादव लोखंडे सासू हे तिघे करीत असे.

तसेच पती तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत असे. याचा मारहाणीला कंटाळून विवाहितेने ३० नोव्हेंबर रोजी राहत्या घरात छताला गळफास घेतला.

तिला जामखेड येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना तिचा काल ६ डिसेंबरला मृत्यू झाला.

विवाहित महिलेच्या माहेरकडील मंडळीना करमाळा तालुक्यातील देवळाली येथील नातेवाईकांना ही माहिती मिळताच या लोकांनी जामखेड पोलीस स्टेशन समोर गर्दी करून सासरच्या मंडळीवर जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेण्यात आला होता.

मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने तिच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. सासरकडील पती, सासू, सासरा यांच्यावर आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment