सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड : नगर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शरद पवार आक्रमक; दिला ‘हा’ इशारा…!

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेंतर्गत १ हजार २७१ किलाेमीटरचा सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग उभारण्यात येत आहे. राज्यात नाशिक, नगर व सोलापूर या तीन जिल्ह्यांतून हा महामार्ग जात आहे.

केंद्र सरकारचा महत्वपूर्ण सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या गावाच्या शिवारातून जात आहे. त्यामुळे येथील अनेक शेतकरी बाधित होत आहेत.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात लवकरच खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. त्यामुळे कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, भूमी अभिलेख विभाग (मोजणी), पाणीपुरवठा विभाग, व महामार्ग संदर्भातील इतर सर्व विभागामार्फत सर्व्हे झालेला आहे.

असे असेल मात्र संयुक्त मोजणी अहवालातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मूल्यांकन प्रक्रिया करू नये. अशी मागणी सभापती प्रवीण कोकाटे यांनी केली.

तर  सुरत – चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गातील बाधित शेतकऱ्यांच्या हरकतीवर सुनावण्या घेतल्या नाहीत व ड्रोन सारख्या जाचक अटी लावून, सर्वे करून,शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम हे सरकार करत आहे.

त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून सुरू असलेली मूल्यांकन प्रक्रिया न थांबवल्यास मोठे आंदोलन करू. असा इशारा सरपंच शरद  पवार यांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, नगर तालुक्याच्या हद्दीतून ९५ गटातून हा महामार्ग जात आहे. या महामार्गात अनेक शेतक-यांच्या अनेक बागायत जमीनी, घरे, शेड, फळबागा, कांदाचाळी विहिरी, बोअरवेल, पाईपलाईन, शेततलाव व सद्य परिस्थितीत पिके जात असून कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, भूमी अभिलेख विभाग (मोजणी), पाणीपुरवठा विभाग, व महामार्ग संदर्भातील इतर सर्व विभागामार्फत सर्व्हे झालेला आहे.

परंतु या विभागामार्फत हा सर्वे करत असताना कोणत्याही शेतक-याला व ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता परस्पर जमिनीचे मूल्यांकन करत असल्याची माहिती आम्हाला समजली आहे.

तरी आपण सर्वाना विश्वासात घेवून जमिनीचे मूल्यांकन करावे. अन्यथा आपण परस्पर जमिनीचे मूल्यांकन करत आहात ते त्वरित थांबवावे. अशी मागणी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe