सुवर्णा कोतकर यांच्या अडचणीत वाढ; अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-  जिल्ह्यातील केडगाव हत्याकांड हे संपूर्ण राज्यात गाजले गेले होते. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते.

दरम्यान या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर एक महत्वाची माहिती समोर आली आहे. केडगावमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयात नामंजूर झाला आहे. त्यामुळे कोतकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

कोतकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयानं दि.15 डिसेंबर रोजी निकाल दिला. यात सरकार पक्षातर्फे ऍड.केदार केसकर यांनी बाजू मांडली.

दरम्यान केडगाव येथे दोन वर्षांपूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांची गोळ्या घालून हत्या झाली होती. या गुन्ह्यात सुवर्णा कोतकर यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता.

हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. मागील महिन्यात कोतकर यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. या विरोधात तपासी अधिकारी यांनी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर आज सुनावणी झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment