अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ लॅब धारकांवर कारवाईची टांगती तलवार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- ज्यांची शैक्षणिक अर्हता पूर्ण नाही किंवा पॅरावैदक परिषदेला लागणारे कागदपत्र ज्यांच्याकडे नाही, अशा लॅबोरेटरीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. अशी माहिती महाराष्ट्र पॅरावैदक परिषदेचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी दिली.

महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पॅरावैदक कायदा अस्तित्वात आला आहे. त्यामध्ये ज्यांची शैक्षणिक अर्हता पूर्ण झालेली आहे, अशा लॅबोरेटरीधारकांना पॅरावैदक परिषदेमार्फत नोंदणी क्रमांक दिला जातो.

ज्यांची शैक्षणिक अर्हता पूर्ण नाही, त्यांच्यावर परिषदेच्या नियमानुसार कारवाई होते. राहुरी तालुक्यात काही अवैधपणे लॅब चालवत असल्याच्या तक्रारी आहेत.

त्यापार्श्वभूमीवर ते म्हणाले की, अशा अनधिकृतपणे व्यवसाय करणार्‍या व्यक्तींच्या नावासह तक्रार प्राप्त होणे आवश्यक आहे.

अशा अनधिकृत व्यावसायिकांची स्थानीय स्वराज्य संस्थांकडून चौकशी होऊन त्याचा अहवाल प्राप्त झाल्यास संबंधितांवर पॅरावैदक परिषद कायद्याच्या कलम 30, 31, 32 प्रमाणे कारवाई होईल, असा इशारा धनंजय कुलकर्णी यांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment