अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- महाराष्ट्र पोलिस विभाग सचिन वाझे प्रकरणामुळे चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर पोलिस विभागात नवा वाझे निर्माण होण्याच्या आत भ्रष्ट आणि बरबटलेल्या
अधिकाऱ्यांवर चौकशीअंती कारवाई करा, अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक अश्वती दोरजे यांच्याकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली.

संगमनेर शहर व तालुक्यात अवैध व्यावसायिकांचा दीड वर्षात उन्माद केला आहे. कत्तलखाने, वाळू तस्करी, मद्य व गुटखा विक्रीसह मटका-जुगार क्लब, चोरीचे भंगार आदी गोरख धंदे सर्रास खुलेआम सुरू आहे.
पोलिस प्रशासनाला तक्रारी व निवेदने देऊनही दुर्लक्ष होत आहे. पोलिस कर्मचाऱ्यांकडे अवैद्य व्यावसायिकांची कायम उठबस असते. सकाळ पासूनच पोलिस स्टेशनला या लोकांची गर्दी असते.
आदी सर्व अवैध व्यावसायिक व त्यांच्या हफ्त्याची माहिती पुराव्यासह विशेष पोलिस महानिरीक्षक दोरजे यांच्याकडे पदाधिकाऱ्यांनी दिली. त्वरित कारवाई करु, अशी ग्वाही दोरजे त्यांनी दिली आहे.
कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शहर प्रमुख अमर कतारी, उपशहर प्रमुख विकास डमाळे, पप्पू कानकाटे, लखन घोरपडे, इम्तियाज शेख, प्रथमेश बेल्हेकर, युवासेना शहर प्रमुख अमोल डुकरे आदींनी निवेदनाद्वारे केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम